Mon, Nov 19, 2018 04:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओला-उबरचालकांचा संप सुरू

ओला-उबरचालकांचा संप सुरू

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह नवी दिल्‍ली, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे येथील ओला उबरचे चालक रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाचा फटका मुंबईकरांना चागंलाच बसणार असून चाकरमन्यांचे सोमवारी प्रचंड हाल होणार आहेत.

कंपन्यांमध्ये असलेल्या ढिसाळ व्यवस्थापनाच्या निषेधार्थ हा संप चालकांनी पुकारला आहे. चालकांनी पाच ते सात लाख रुपये गुंतवले आहेत. दीड लाख रुपये प्रतिमहिना मिळतील असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र त्यातील अर्धी रक्‍कमही या कंपन्यांनी दिली नसल्याची तक्रार आहे. कंपन्यांकडून त्यांच्या मालकीच्या वाहनांना प्राधान्य देण्यात येते. त्याचा परिणाम चालकांच्या उत्पन्‍नावर होत आहे. असा आरोपही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेेने केला आहे. कमी रेटींगच्या चालकांची पुन्हा नियुक्‍ती करावी आणि वाहनानुसार भाडे निश्‍चित करावे अशा विविध मागण्याही या संपाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सद्या 45 हजार कॅब आहेत. या व्यवसारता 20 टक्के घट झाली आहे. कर्ज काढून गाडी घेवून काम करणार्‍यांना चालकांना त्यांचा हत्पा भरणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे गाड्या बँका जमा करत आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत संप चालूच राहिल असा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले.