Wed, Nov 21, 2018 04:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाईन

बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाईन

Published On: May 05 2018 1:36AM | Last Updated: May 05 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत यंदा बारावीचे प्रवेश ऑफलाइन प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात अकरावीला नामांकित आणि आवडीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग बंद झाला होता. अकरावीत ऑनलाइन प्रवेश घेऊन बारावीला महाविद्यालय बदलणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कॉलेजबदलणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याला चाप लावण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून अकरावी प्रवेशांबरोबरच बारावीचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करण्याचे विचार चालू होता. मात्र यंदाही हा निर्णय बारगळा आहे. यंदाही पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन प्रवेश होणार आहेत. तशा सूचना 3 मे 2018 च्या पत्राने शिक्षण विभागाने सूचना शिक्षण संचालकांना दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांनी डाटाबेसमध्ये तशा प्रकारे बदल करणे आवश्यक असणार आहेत.

केवळ अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेश 

सद्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे

पालकांची बदली होणे

वैद्यकीय कारणास्तव परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे

शाखा बदलून मिळणे

विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे

बारावीमध्ये विद्यार्थ्यांचा बोर्ड बदलण्याचा असल्यास

Tags : mumbai, Offline, admission,  HSC