Sat, Dec 07, 2019 14:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजा ढाले यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण 

राजा ढाले यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण 

Published On: Jul 17 2019 3:13PM | Last Updated: Jul 17 2019 3:13PM
विक्रोळी : प्रतिनिधी

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे मंगळवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज (दि.१७) दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सुरेश माने, एकनाथ गायकवाड, अर्जुन डांगळे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यांची अंत्ययात्रा विक्रोळी, घाटकोपर विभागात फिरून दादर येथे चारपर्यंत पोहचणार आहे. राजा ढाले यांच्या निधनाची बातमी राज्यभरातील आंबेडकरी जनतेला कळताच आज सकाळपासून त्यांच्या घरी शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. विक्रोळी टागोरनगर येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पार्थिवावर आदरांजली वाहण्यात आली.