Fri, Apr 26, 2019 02:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › LIVE : 'ओखी'मुळे गुजरातमध्ये अलर्ट, मुंबईत संततधार!

LIVE : 'ओखी'मुळे गुजरातमध्ये अलर्ट, मुंबईत संततधार!

Published On: Dec 05 2017 9:48AM | Last Updated: Dec 05 2017 3:30PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

केरळ आणि तामिळनाडूत थैमान घालणार्‍या ओखी चक्रीवादळाचे तडाखे कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बसू लागले आहेत. समुद्राला उधाण आले असून मुंबईलगतच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. महानगरात पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाच्या मुंबईतील रेल्‍वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून मध्य रेल्‍वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईसह कोकणातही पाऊस सुरू झाला आहे. दुपारी मोठ्या उंचीच्या लाटा येणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, मुंबईसह कोकणातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ६ डिसेंबरपर्यंत ओखीचे वादळ या किनारपट्टीवर घोंघावणार आहे. 

ओखी वादळ : अपडेट

समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता

सीएसटीला जाणारी वाहतूक १० मिनिटे उशीरा

वेस्‍टर्न एक्‍स्‍प्रेस महामार्ग, ईस्‍टर्न फ्री वेवर मोठी कोंडी

मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, पालघरमध्येही आज शाळा बंद

आज दुपारी १२.४३ वाजता समुद्राला भरती

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक धीम्या गतीने

समुद्रात ४.३५ मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता

ओखी वादळाचा राजकीय सभांना फटका; अमित शहांच्या गुजरातमधील ३ सभा रद्द

दादर, परळ, लालबागमध्ये जोरदार पाऊस

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला