Wed, Jan 16, 2019 17:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओला चालकांचा संप अखेर मागे

ओला चालकांचा संप अखेर मागे

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

ओला वाहनचालकांनी पुकारलेला संप तिसर्‍या दिवशी मागे घेण्यात आला. ओला उबर प्रशासनाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात हा संप पुकारण्यात आला होता. यामध्ये मुंबई परिसरातील 45 हजार वाहन चालकांनी सहभाग घेतल्याचा दावा मनसेने केला होता. दरम्यान उबर चालकांनी मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. 

ओला व्यवस्थापनाचे प्रतिनिधी व मनसेच्या शिष्टमंडळाची वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक व उपाध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. काही मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले असून उर्वरित मागण्या पुढील 20 दिवसांत मान्य करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

काळ्या यादीत टाकलेली वाहने व चालकांचा आढावा घेऊन त्यांचा व्यवसाय टप्प्याटप्याने सुरू करण्यात येईल. ओलाचे सर्व वाहन चालक-मालक यांना भागीदारी करारनामा मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, ओला वाहनांवरील स्टीकर मराठी भाषेत असतील, सर्व वाहन मालक यांना व्यवसाय विकास कार्यक्रम राबवण्यात येईल अशी आश्‍वासने ओलातर्फे देण्यात आली आहेत. उबर प्रशासनासोबत गुरूवारी चर्चा होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.