Sun, Jul 21, 2019 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओला, उबरच्या चालकांचा संप सुरूच

ओला, उबरच्या चालकांचा संप सुरूच

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी 

ओला-उबर कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायी व्यवस्थापनाविरोधात चालकांनी पुकारलेला संप सुरू असून योग्य निर्णय मिळेपर्यंत तो मागे घेणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कंपन्यांकडे प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती परंतु त्यांनी चर्चेसाठी मंगळवारीही वेळ दिलेली नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  

या आंदोलनाला मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, ग्रेटर नोयडा, दिल्ली, चेन्नई, तेलंगणा, बंगळुरू या ठिकाणी असलेल्या ओला-उबर चालक मालकांनी आपला पाठिंबा दिला आहे. कंपनीने स्वतःची वाहने खरेदी केल्याने ओला व उबरच्या भरवशावर वाहने खरेदी केलेल्या चालकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. बुधवारीही  चालक ऑफलाईन राहतील, असे जाधव म्हणाले.