Sat, Dec 07, 2019 13:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाण्याअभावी नर्सरीतील रोपे वाळल्याने नुकसान 

पाण्याअभावी नर्सरीतील रोपे वाळल्याने नुकसान 

Published On: Jul 18 2019 7:16PM | Last Updated: Jul 18 2019 7:16PM

अंधारी येथील अनिल नारायण वैष्णव या युवकाने विठ्ठल -रुक्मिणी नर्सरी रोपवाटिका सुरू केली. पाण्याअभावी नर्सरीत असलेली  सर्व रोपे वाळून गेल्याने सदरील युवकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अंधारी : प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील अनिल नारायण वैष्णव या तरुण युवकाने विठ्ठल -रुक्मिणी नर्सरी रोपवाटिका सुरू केली. बारा रुपये प्रतिनग अशा एकूण एक लाख रोपांची खरेदी केली. परंतु पाण्याअभावी नर्सरीत असलेली सर्व रोपे वाळून गेल्याने सदर युवकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

नोकरीच्या मागे न लागता स्वतःहा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दडी मारल्याने परिसरातील विंधन विहिरींना तळ ठोकले. नर्सरीत असलेल्या रोपांना पाणी न मिळाल्यामुळे सर्व रोपे पाण्याअभावी वाळून गेल्याने सदरील अनिल वैष्णव यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. उधारी उसनवारी व बँकांचे लोन घेऊन सदरील तरुण युवकाने व्यवसाय सुरू केला मात्र पाण्याअभावी नर्सरी नर्सरीतील सर्व रोपे वाळून गेल्याने हा व्यवसाय डबघाईत आला आहे.