Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता रिक्षा, टॅक्सी इरादापत्र मिळणार केवळ १० मिनिटांत

आता रिक्षा, टॅक्सी इरादापत्र मिळणार केवळ १० मिनिटांत

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:21AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ऑनलाईन पध्दतीने आरटीओ कार्यालयात आता रिक्षा टॅक्सी परवान्यासाठी लागणारे इरादापत्र केवळ 10 मिनिटात मिळणार आहे, अशी माहिती राजाराम बापू पाटील  रिक्षा टॅक्सी चालक मालक  संघटनेचे अध्यक्ष श्री.शामराव मोकाशी यांनी दिली.

रिक्षा टॅक्सी परवान्याच्या माहिती पत्रकासाठी राज्यात पन्नास आरटीओमध्ये ऑनलाईनव्दारेच अर्ज करावा लागणार आहे, तो अर्ज, आधार कार्ड, लायसन्स बिल्ला, पॅनकार्ड आदी कागदपत्र थेट आरटीओ कार्यालयात दिली की, ऑनलईनव्दारेच इरादापत्र मिळणार आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जाला क्‍लिक करण्यासाठी फक्त त्या अधिकार्‍याला अडिच मिनिटाचा कालावधी लागणार आहे. दहा मिनिटात एका आरटीओ कार्यालयातून चार अर्जदारांना इरादात्र मिळतील. इरादापत्र हे परवाना नसून परवाना मिळविण्यासाठी माहिती पत्रक आहे, असे मोकाशी यांनी सांगितले.

पुर्वी परवाना मिळविण्यासाठी चालकांची होणारी पिळवणूक आता थांबणार आहे. ही इरादापत्र सहज त्याच दिवशी ताबडतोब मिळणार आहे.  एका आरटीओ कार्यालयातून दहा मिनिटात चार इरादापत्र ऑनलाईन मिळणार असून पन्नास आरटीओमधून दोनशे इरादापत्र फक्त दहा मिनिटात ऑनलाईन मिळणार आहेत, असे शामराव मोकाशी यांनी सांगितले.