Thu, Nov 22, 2018 00:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीचा पुनर्विकास आता एनबीसीसी कंपनी करणार

धारावीचा पुनर्विकास आता एनबीसीसी कंपनी करणार

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

धारावीच्या पुनर्विकासासाठी पायघडया घालूनही चारवेळा काढलेल्या जागतिक निविदा प्रक्रियेमध्ये विकासक भाग घेत येत नसल्याने पुन्हा एकदा धारावीतील 1 ते 4 सेक्टरच्या  पुनर्विकासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. मात्र यावेळीही विकासक कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये रस दाखवला नाही तर सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) कंपनीमार्फत पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

गेल्यावर्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर काढलेल्या निविदांना चार  वेळा मुदतवाढ देऊनही एकाही कंपनीने निविदा दाखल न केल्याने पेच निर्माण झाला होता. आता पुन्हा निविदा प्रकिया सुरू करण्यात येणार असून जर यावेळी विकासक आले नाही तर शासन एनबीसीसी कंपनीमार्फत धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. धारावीमधील सेक्टर-5 च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपवण्यात आले आहे. धारावीच्या सेक्टर-1 ते 4 चे काम धारावी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. 

धारावी पुनर्विकासासाठी अधिकाधिक विकासकांनी पुढे यावे यासाठी प्राधिकरणाने धारावीतील 1 ते 4 सेक्टरचे 12 सब सेक्टर करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठवला, मात्र यानंतरही विकासक येण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने अखेर एनबीसीसीची मदत घेण्याचे ठरवले. कंपनीने सहकार्य केल्यास लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार  असल्याचे सूत्रांनी सांगितले.