Sun, Sep 23, 2018 11:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता पाठवा व्हॉट्स अ‍ॅपवरूनही पैसे

आता पाठवा व्हॉट्स अ‍ॅपवरूनही पैसे

Published On: Jan 18 2018 8:07PM | Last Updated: Jan 18 2018 8:07PMमुंबई : वृत्तसंस्था 

व्हॉट्स अ‍ॅप आता फक्‍त चॅटिंगसाठी नव्हे, तर पैसे पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठीदेखील उपयोग करता येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपही डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यास सज्ज झाले असून (युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर (यूपीआय) आधारित पेमेंट सुविधा पुढील महिन्यापर्यंत सुरू करणार आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सिस या बँकांच्या सहकार्याने व्हॉट्स अ‍ॅप ही सुविधा सुरू करणार आहे. डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ‘सिक्युरिटी चेकिंग’ होताच काही ठराविक यूजर्सच्या माध्यमातून त्याचे अंतिम टेस्टिंग सुरू होईल. त्यानंतरच हे फिचर सर्वांसाठी खुले होणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपला गेल्या वर्षी जुलैमध्येच यूपीआयशी संलग्‍न करण्याची परवानगी मिळाली होती.