आता लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे

Last Updated: Nov 09 2019 1:29AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी 
बहुमत मिळविणार्‍या भाजप शिवसेनेत बिनसल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला असून आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला ते सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करतात की दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला निमंत्रण देतात ? याबाबत उत्सुकता आहे. मात्र,  भाजपने सत्ता स्थापन केली नाही आणि शिवसेनेला काँग्रेस — राष्ट्रवादीने पाठींबा दिला नाहीतर किमान महिनाभर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. 

राज्यात भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता संघर्ष शिगेला गेल्याने युती तुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपकडे स्वबळावर सरकार स्थापन होईल ऐवढे संख्याबळ नाही. अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांना घेऊन सत्ता स्थापन करता येईल अशीही परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार का? याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवे सरकार भाजपच्या नेतृत्वातच स्थापन होईल असा दावा केल्याने ते सत्तासमिकरण कसे जुळवितात याबाबतही उत्सुकता आहे. 

भाजप, शिवसेना तसेच विरोधकांमधूनही कोणीच सत्ता स्थापनेसाठी पुढे आले नाहीतर राज्यपालांना स्वत: पुढाकार घेऊन राजकीय पक्षांची चर्चा करावी लागेल. मात्र, त्यातूनही सत्ता समिकरण जुळले नाहीतर राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही.  

 शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत पडद्याआड चर्चा केली असली तरी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत दोघांनीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. दोन्ही पक्षात शिवसेनेला पाठींबा देण्यावरुन दोन गट पडले आहेत. त्यामुळे या पेच प्रसंगातून मार्ग काढण्याचे आव्हान राज्यपालांपुढे आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने राज्यपाल कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागल्याचे सांगितले. 

#पुन्हानिवडणूक हा मराठी कलांकाराकडून ट्विटरवर ट्रेंड; धनंजय मुंडे काय म्हणाले?


सांगली जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडून स्वागत


नितीन गडकरींच्या 'त्या' वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांकडून टोला!


नारायण राणे सारख्यांच्या राजकारणी लोकांचे दिवस आता संपले आहेत; विनायक राऊतांची बोचरी टीका


डी. के. शिवकुमार आणि पी चिदंबरम यांच्यासाठी ईडीकडून फक्त 'कॉपी-पेस्ट'!


आदिवासींना मोठा दिलासा; वन कायद्यातील सुधारणांचा मसूदा मागे


अवमानना प्रकरणात सिंग बंधू दोषी


सत्तास्थापनेच्या संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात : निलम गोर्‍हे


लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, राज ठाकरेंनी घेतली भेट


पनवेल : वडिलांनी बाईक न दिल्‍याने मुलाने स्‍वत:ला पेटवले