Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता पालघरचेही जिल्हा विभाजन

आता पालघरचेही जिल्हा विभाजन

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 2:06AMवसई : प्रतिनिधी

4 वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या स्वतंत्र आदिवासी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याची प्रशासकीय घडी अद्याप नीट बसलेली नसतानाच आता पालघर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जव्हार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

राज्यात 36 जिल्हे आणि 288 तालुके अस्तित्वात येणार आहेत. शासनाने नव्याने तयार केलेल्या यादीमध्ये जव्हार या नव्या जिल्ह्याचा समावेश आहे. याबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समिती येत्या 31 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे.

येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राज्यात छोटे जिल्हे आणि तालुके निर्माण होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले पालघर शहर हे दीड तासांच्या अंतरावर असल्यामुळे वरील 3 तालुक्यांतील आदिवासी समाजाला तेथे ये-जा करणे अवघड आहे. पालघर जिल्हा निर्मितीच्या वेळी या तालुक्यांतील ग्रामस्थांनी पालघर येथे मुख्यालय स्थापन करण्यास कडाडून विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचे पुन्हा विभाजन होण्याची शक्यता आहे.