Thu, Jul 18, 2019 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता वायफायची जागा घेणार लायफाय तंत्रज्ञान

आता वायफायची जागा घेणार लायफाय तंत्रज्ञान

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 12:46AMमुंबई : प्रतिनिधी

वायफायपेक्षाही अधिक वेगवान लायफाय अर्थात लिक्विड फिडॅलिटी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षा 100 पट अधिक असणार आहे. आता वायफायची जागा लायफाय घेणार असल्याचे चित्र समोर येत आहे.

लायफायमध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. 2011 मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लायफायचे संशोधन केले आहे. वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो, हे त्यांना आढळून आले आणि त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान अनेक देशांत रुजू लागले आहे.

लायफाय या तंत्रज्ञानाचा शोध 2011 पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या लायफाय तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला 10 गिगाबाइट्स इतका आहे.
लायफाय तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड (यूके) या देशांमध्ये केला जात आहे. मेक इन इंडिया ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. लायफायच्या माध्यमातून माणसाच्या डोळ्यांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकता येते. 

वायफायच्या तुलनेत लायफायचा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाही. लायफाय या तंत्रज्ञानात एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. या बल्बमध्ये एक मायक्रोचिप बसवण्यात येते. व्हिजिबल लाइट कम्युनिकेशन (व्हीएलसी) अर्थात दृश्य प्रकाश वहन या माध्यमातून ते काम करते.

Tags : Mumbai, Mumbai news, Now, Wi-Fi, replace, Li-Fi, Technology,