Thu, Jul 18, 2019 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता आव्हान एफवाय प्रवेशाचे

आता आव्हान एफवाय प्रवेशाचे

Published On: Jun 01 2018 1:37AM | Last Updated: Jun 01 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात एफवायला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून (1 जून) पासून  सुरू होत आहे. प्रवेशाची पहिली यादी 12 जूनला जाहीर केली जाणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. पहिली यादी महाविद्यालयात 12 जून रोजी लागणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी नोंदणी आवश्यक

 प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

 प्रवेश घेताना इकडे लक्ष द्या

  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका खरेदी करून माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमूहाप्रमाणेच (उेालळपरींळेप) विषय निवडणे बंधनकारक असणार आहे.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.
  • विद्यार्थ्यांने शिक्षणक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्वतःचा स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरीची  सॉफ्टकॉपी सोबत असणे आवश्यक आहे.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्याचा स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे  अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
  • स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.