Fri, Jul 10, 2020 20:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासनाला फसवणार्‍या खासगी दवाखान्यांना नोटिसा

शासनाला फसवणार्‍या खासगी दवाखान्यांना नोटिसा

Last Updated: Jun 03 2020 1:11AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांच्या 80 टक्के बेड्स राज्य शासनाने ताब्यात घेतले असताना या खासगी रुग्णालयांनी प्रत्यक्षात 50 टक्केच खाटा पालिकेच्या स्वाधीन केल्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टाकलेल्या धाडीमध्ये स्पष्ट झाले. 

सोमवारी रात्रीपाासून मंंगळवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या धाडसत्रानंतर  बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लीलावती अशा धनिक रुग्णांनाच प्राधान्य देणार्‍या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

दहा दिवसांपूर्वी राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी काढलेल्या आदेशात कोरोना आणि इतर रुग्णांसाठी 80 टक्के बेड्स खासगी रुग्णालयांनी राखीव ठेवायचे आहेत, असे म्हटले होते. त्यानुसार  एकूण 3500 बेड्स खासगी रुग्णालयांमधून मिळणे अपेक्षित असताना फक्त 50 टक्के म्हणजेच 1500 एवढेच बेड्स मिळवण्यात पालिकेला यश आले. 

रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत राहिल्याने सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.