Sat, Nov 17, 2018 01:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वापरात नसलेल्या दहावीच्या कोर्‍या उत्तरपत्रिका रस्त्यावर

वापरात नसलेल्या दहावीच्या कोर्‍या उत्तरपत्रिका रस्त्यावर

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेच्या काळातच मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर दहावीच्या कोर्‍या आणि वापरात नसलेल्या उत्तरपत्रिकाच रस्त्यावर पडलेल्या मिळाल्याने एकच खळबळ उडाली. वापरात नसलेल्या उत्तरपत्रिका कोठून आल्या याच्या चौकशीच्या सूचना  मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून दिल्या असून यासंदर्भातील तक्रार कन्‍नमवार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेच्या काळात मुंबई विक्रोळीजवळ पूर्व द्रुतगती मार्गावर दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचा खच रस्त्याच्या बाजूला बेवारस अवस्थेत पडला होता. या उत्तरपत्रिका असल्याचे रस्त्यावर जाणार्‍या नागरिकांना समजताच एकच गोंधळ उडाला.  यासंदर्भातील माहिती तात्काळ मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला देण्यात आली.  तत्काळ दोन अधिकार्‍यांना पाठवून कन्‍नमवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या उत्तरपत्रिका कोर्‍या व जुन्या आणि वापरात नसलेल्या असल्या तरी शिक्षण मंडळाच्या उत्तरपत्रिका रत्यावर कशा आल्या यासंदर्भातील चौकशी आता होणार आहे. शाळा तसेच परीक्षा केंद्रांचा  ढिसाळ कारभारामुळे हे झाले का याचीही चौकशी केली जाणार आहे.

 

Tags : Not, use, Class X, answer sheet, On the road,