Mon, Mar 25, 2019 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नॉनस्टॉप अ.भा. नाट्यसंमेलन उद्यापासून

नॉनस्टॉप अ.भा. नाट्यसंमेलन उद्यापासून

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:21AMमुंबई : संजय कुळकर्णी   

मुलुंड येथे साजरं होणार्‍या 98 व्या नाट्य संमेलनाचे काऊंट डाऊन सुरु झाले असून मंडप आणि इतर उभारणीसाठी गती आलेली आहे. मुलुंड कार्यालयात कार्यकर्त्यांचे येणं जाणं वाढलेले आहे. कधी नव्हे  ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात रात्रौ 11 वाजेपर्यंत अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी संमेलनाची आखणी करताना दिसत आहेत. 

नाट्य परिषदेचे  प्रवत्ते मंगेश कदम यांनी संमेलनाची कार्यक्रम पत्रिका दिल्यावर त्यातील वेगळंपण लागोलग ठळकपणे दिसून आले. नाट्य संमेलनात नाट्य दिंडीला विशेष महत्व आहे. बुधवार 13 जून ला सायंकाळी 4 वाजता नाट्य दिंडी निघणार असून त्यात 400 लोककलावंतांचा सहभाग असणार आहे.या दिंडीचे सर्वेसर्वा नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे हे आहेत. ही नाट्य दिंडी मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशन पासून सुरु होऊन एम जी रोड - पाच रस्ता मार्गे महाकवी कालिदास नाट्य गृहात येईल. प्रियदर्शनी क्रिडा संकुलात संकुलात उभारण्यात आलेल्या सुधा करमरकर रंगमंचावरून उदघाटन सोहळ्यास सायंकाळी 6. 30 वाजता प्रारंभ होणार आहे.  रात्रौ 8 . 30 वाजता अष्टविनायक, एस .एच . एन्टरप्राइयझेस संगीत सौभद्र सादर करतील. 

गुरवार 14 जून रोजी मध्यरात्री 12 . 30 वाजता पंचरंगी पठ्ठेबापूराव हा कार्यक्रम लोकरंग सांस्कृतिक मंच महाकवी कालीदास रंगमंचावर सादर करतील . पहाटे 3 वाजता रंगाबाजी हा लावण्यांचा कार्यक्रम सप्तसुर सादर करेल . हा कार्यक्रम यमुनाताई वाईकर यांना समर्पित केला जाणार आहे. राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या प्रातः स्वराने पहाटे 6 वाजता किशोरीताई आमोणकर रंगमंचावर स्वरांचा निनाद उमटेल.

सकाळी 10 वाजता रंगसंवाद प्रतिष्ठान , सोलापूर तेलेजू हे बालनाट्य महाकवी कालिदास रंगमंचावर तर   11 वाजता महाराष्ट्र कल्चरल सेंटर , पुणे जंबा बंबा बू हा ग्रिप्स थिएटर वर सादर होणारा नाट्य प्रयोग ,  इतिहास गवाह है ही बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे यांची एकांकीका दुपारी 2 वाजता ,  तुका म्हणे ही नृत्य नाटिका कालवर्धनी,पुणे दुपारी 3 वाजता सादर करेल. सांस्कृतिक आबादुबी हा परिसंवाद डॉ. हेमू अधिकारी रंगमंचावर होणार आहे. गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार वितरण सोहळा , नाट्य संमेलन अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मुलाखत , नाट्य प्रवेश व नाट्यसंगीत सायंकाळी 6 वाजता महाकवी कालिदास रंगमंचावर होईल. रात्रौ 9 वाजता संगीतबारी काळी बिल्ली प्रॉडक्शन सादर करतील. 

शुक्रवार 15 जून रोजी मध्यरात्री 12 . 30 वाजता लोककला जागर होणार असून त्यात झाडीपट्टी दंडार , पोतराज , नमन , दशावतार यांचे सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम महाकवी कालिदास रंगमंचावर होईल. पहाटे 6 वाजता मंजुषा दातार आणि सावनी शेंडे यांच्या प्रातः स्वराने किशोरी आमोणकर रंगमंच निनादणार आहे. डॉ. हेमू अधिकारी रंगमंचावर एकपात्री महोत्सव सकाळी 10 वाजता सुरु होईल. महाकवी कालिदास रंगमंचावर सकाळी 10 वाजता साडेसहा रुपयांचं काय केलस ?नाट्य परिषद सोलापूर शाखा , चित्र - विचित्र नाट्य परिषद अमरावती शाखा  यांच्या  एकांकिका सादर होतील. 

शिकस्त - ए - इष्क हे प्रायोगिक नाटक  ड्रिम थिएटर्स मुंबई दुपारी 12 वाजता सादर करेल. या संमेलनाचे  आकर्षण असलेले  अंध कलाकारांचा अपूर्व मेघदूत हे 2 अंकी नाटकआरलिन प्रॉडक्शन, पुणे महाकवी कालिदास रंगमंचावर दुपारी 3 वाजता  सादर होईल. सायंकाळी 5 . 30 वाजता खुले अधिवेशन व समारोप होणार असून रात्रौ 9 वाजता रंगयात्रा हा संगीत रंगभूमीचा प्रवास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रसिकांसमोर पेश करणार आहे. 

शनिवार मध्यरात्री 12 . 30 वाजता सुखं न  हा वाईड विंग्ज मीडिया प्रस्तुत कार्यक्रमाने 98 व्या नाट्य संमेलनाची सांगता होईल. संमेलनात सादर होणारे सर्व कार्यक्रम हे रसिकांसाठी विनामूल्य आहेत. एकंदरीत यंदाचे नाट्य संमेलन नॉन स्टॉप 60 तास  भरगच्च कार्यक्रमाने साजरे होणार हेच अधोरेखित करते.