Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नऊ वर्षे शरीरसंबंध नसल्याने लग्न रद्द : HC

नऊ वर्षे शरीरसंबंध नसल्याने लग्न रद्द : HC

Published On: Apr 30 2018 10:01AM | Last Updated: Apr 30 2018 10:16AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

लग्न झाल्यापासून पती आणि पत्नीमध्ये कधीही शरीरसंबंध प्रस्थापित झाले नसल्याच्या कारणावरुन मुंबई उच्च न्यायालयाने नऊ वर्ष जुने लग्न रद्द केले. कोल्हापुरातील एक विवाहित जोडपे लग्न झाल्यापासून कायदेशी लढाई लढत होते. महिलेने आरोपीच्या विरुध्द लग्नाच्या प्रमाणपत्रावर खोटी सही घेऊन मला फसवले आहे. त्यामुळे हे लग्न रद्द करण्यात यावे अशी याचिका दाखल केली होती. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भातकर यांनी सांगितले की, दोन्ही पक्षकारांमध्ये कधीही शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याचे पुराव्यावरुन सिध्द होत नाही. त्यामुळे हे लग्न रद्द करत असल्याचा निकाल दिला. हा निकाल देताना त्या म्हणाल्या ‘दोन व्यक्तींमध्ये नियमीत शरीरसंबंध असणे हा कोणत्याही लग्नाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. जर एखाद्याच्या वैवाहिक जीवनात शरीरसंबंध निर्माण झाले नसतील तर लग्नाचा उद्देश सफल होत नाही.

या खटल्यात दोन्ही पक्षकार एक दिवसही एकमेकांसोबत राहिलेले नाहीत. तसेच पतीकडून त्या दोघांमध्ये  शरीरसंबंध असल्याचे पूरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुराव्या अभावी पत्नीची बाजू ग्राह्य धरून हे लग्न नॉन- कॉन्सुमेशन मॅरेज (शरीरसंबंधाशिवाय असलेले लग्न) असल्याचे सिध्द होते. त्यामुळे ते रद्द करण्यात येत आहे. 

न्यायमूर्ती मृदुला भातकर यांनी पत्नीचा तिच्या पतीने फसवून लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. त्या म्हणाल्या की ‘एक सुशिक्षत पदवी संपादन केलेल्या स्त्रीला फसवून लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही घेतली हे पटण्यासारखे नाही.’
 

Tags : mumbai, kolhapur, Bombay High Court, non-consummation of marriage, nullifies marriage