Tue, Apr 23, 2019 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नो हॉर्न डे’जनजागृतीसाठी गृहराज्यमंत्री रस्त्यावर!

‘नो हॉर्न डे’जनजागृतीसाठी गृहराज्यमंत्री रस्त्यावर!

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:41AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबाबत चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजीत पाटील बुधवारी रस्त्यावर उतरले. स्वतः वाहनचालकांना हॉर्न बंदीची पत्रके वाटत त्यांनी चालकांचे लक्ष वेधले. 

कर्णकर्कश हॉर्नमुळे रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. या आवाजाचे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अचानक वाजलेल्या हॉर्नमुळे गंभीर अपघात घडले आहेत. या अनपेक्षित घटना टाळण्यासाठी नो हॉर्न डे हा उपक्रम राबविण्यात आला. ध्वनिप्रदूषणमुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पाटील यांनी केले.  

वाहन चालकांकडून वाजविल्या जाणार्‍या हॉर्न्समुळे सगळ्यांनाच त्रास होतो. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नो हॉर्न डे उपक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सुरू केला आहे. मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाच्या मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीची पत्रके देत आहेत.