एनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार

Last Updated: Nov 09 2019 10:03PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) सुविधेवर जानेवारी 2020 पासून शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना केली आहे.

बँकांकडून एनईएफटी व्यवहारांवर जीएसटीखेरीज शुल्क आकारले जाते. जानेवारीपासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन एनईएफटी सेवेवर शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना देण्यात आली आहे. आरबीआयने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम अर्थात आरटीजीएसवरील व्यवहारांवरीलही शुल्क हटविण्याचा निर्णय आरबीआयने याआधी घेतला आहे. 

ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयकडून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही सेवांवरील शुल्क हटविल्यानंतर आरबीआय समिती नियुक्‍ती करणार आहे. ही समिती जलद प्रतिसादाची माहिती घेणार आहे. ऑनलाईन व्यवहारांत वाढ होत असल्याने ग्राहकांना लाभ देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याचे आरबीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे.
 

बीड : पिंपरवाडा येथे विवाहितेवर अतिप्रसंग


पर्यायी सरकारसाठी उद्या दिल्लीत खलबत्ते


बेळगाव : वडापावच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट


'थांबा माझी बॅटच बोलेल' पृथ्वी शॉचे बोलके हावभाव 


जुना बुधवार पोलिस लाईनमधील वृक्षतोडीला विरोध : झाडे वाचविण्‍यासाठी धडपड (video)


गणेश नाईक कोणाच्याही संपर्कात नाहीत : माजी आमदार संजीव नाईक


शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांचा लोकलने प्रवास


अधिकची मदत, पीकविम्याचे पैसे द्या; भाजपची राज्यपालांकडे मागणी  


अयोध्या खटल्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका : एआयएमपीएलबी


केरळमधल्या शाळांमध्ये पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी वाजते घंटा