Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा : कम्युनिस्ट पक्ष 

नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा : कम्युनिस्ट पक्ष 

Published On: Jan 12 2018 2:26PM | Last Updated: Jan 12 2018 2:26PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

एक इंचही जमीन नौदलाला देणार नाही, नौदलाने मुंबईत राहण्याऐवजी पाकीस्तानच्या सीमेवर जावे. असे वक्‍तव्य करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाची बिनशर्त माफी मागावी व आपल्‍या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भाकपचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांनी ही मागणी केली आहे. 

देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मुंबईचा समुद्रकिनारा व एकंदरीत समुद्रकिनारे संरक्षित असले पाहीजेत. त्याबाबत नौदलाचे मत लक्षात घेतलेच पाहीजे. ते सोडून नौदलाला पाकीस्तानच्या सीमेवर जा. असे सांगणे म्हणजे गडकरींनी दुसऱ्या कसाबला निमंत्रण देण्यासारखे आहे. असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. 

मुळात ही जमीन गडकरींच्या खासगी मालकीची नाही. ही जमीन कॉर्पोरेट सेक्टरला, पंचतारांकीत हॉटेल, तरंगती हॉटेल्स,कॅसिनो, काळ्या पैसेवाल्या उच्चवर्गीयांच्या खाजगी बोटीसाठी जेटी बांधून त्‍यांना टुरीझमच्या नावाखाली देण्याचे गडकरींचे कारस्थान आहे,  असे असताना नौदलावर टीका करण्याचे काही प्रयोजन नव्हते.  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा वापर करण्यासाठी पारदर्शक प्रक्रीया राबवण्याची गरज आहे.  त्यासाठी गडकरींनी फतवे काढण्याची गरज नाही. असे रेड्डी यांनी म्‍हटले आहे. 

रेड्डी म्‍हणाले, ‘‘देशभक्तीसाठी सैन्यदलाचा, नौदलाचा वारंवार उपयोग करणऱ्या आरएसएसचे स्वयंसेवक असलेल्या गडकरींचे बेगडी व खरे स्वरूप या नौदलाबाबत केलेल्या विधानाने जनतेसमोर आले आहे. त्यांना देशाच्या संरक्षणापेक्षा पंचतारांकीत, तरंगत्या हॉटेलवाल्यांचे, कॅसिनोवाल्याचे हित जास्त प्रिय आहे.’’