#CycloneNisarga कोरोना संकटात 'निसर्ग' चक्रीवादळाचे अस्मानी संकट! (photos)

Last Updated: Jun 03 2020 11:03AM
Responsive image


मुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना निसर्ग चक्रीवादळ हे मोठे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. रत्नागिरीत वाऱ्याची गती वाढली असुन सकाळी वाऱ्याचा वेग प्रतितास ५५ ते ६५ किमी इतका होता. कोकण किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाचा वेग ७५ किमी प्रतितास इतका होणार आहे.

सध्या वादळ अलिबागपासून १३० किमी दूर असून, वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास इतका होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या सर्व घडामोडीच्या छायाचित्राद्वारे घेतलेला थोडक्यात आढावा....

मुंबई: मरीन ड्राइव्ह परिसरातील परिस्थिती

Image

Image

गोवा: मुसळधार पाऊस

Image

Image

रायगड, अलिबाग, येथील सुमारे १५,०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले

Image

ठाणे:  मीरा भाईंदरमधील उत्तान गावातील लोकांचे स्थलांतर 

Image

रायगड किनारपट्टीवर एनडीआरफचे जवान तैनात 

Image

Image

पालघर येथील केळवा गावात एनडीआरफचे जवान तैनात 

Image

एनडीआरएफच्या पथकाने  कोळीवाडा, अलिबाग, येथील नागरिकांचे पहाटे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले 

Image

पालघर: येथील समुद्र किनारपट्टीजवळील डाहाणू आगर गावातील ७०रहिवाशांना वसतिगृहात हालवण्यात आले आहे. 

Image

Image

पालघर: किनारपट्टीवरून २१ हजार लोकांचे स्थलांतर. या सर्व नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी मास्क, हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती कैलास शिंदे, पालघर जिल्हाधिकारी यांनी दिली. 

Image