Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डावखरेंची उमेदवारी निश्‍चित

डावखरेंची उमेदवारी निश्‍चित

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 12:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

निरंजन डावखरे यांच्यासारख्या तरुण, तडफदार नेतृत्वाचा कोकणात पक्षवाढीसाठी निश्‍चितच फायदा होईल. त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात केलेले काम पहाता त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शिफारस केंद्रीय नेतृत्वाला केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देणार्‍या आमदार निरंजन डावखरे यांना गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. 

निरंजन डावखरे यांनी आपली भेट घेऊन राष्ट्रीय प्रवाहात काम करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. आपणही त्यांच्या या विचाराचे स्वागत करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी चर्चा केली होती. त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून चांगल्या प्रकारे काम केले आहे.

निरंजन डावखरे हे एक तरुण, तडफदार नेतृत्व असून त्याचा भाजपला स्थानिक ठिकाणी पक्षाचे काम वाढविण्यासाठी उपयोग होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादीचे अन्य आमदार आणि नेतही आपल्या संपर्कात आहेत का? ते भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. 

मुख्यमंत्री म्हणाले की, निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे हे लोकप्रिय व अजातशत्रू नेते होते. त्यांनी तीन दशके काम केले. तीच परंपरा निरंजन डावखरे चालवत असून ठाणे - कोकण भागातील ते धडाडीचे नेते आहेत. गेली सहा वर्षे विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करू. 

केंद्रीय समितीकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळेल व आगामी निवडणुकीत ते चांगल्या मतांनी निवडून येतील. तर विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीने भाजपाचा विजय निश्चित असून त्यामुळे कोकणात भाजप अधिक बळकट होईल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.