होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निरंजन डावखरेंचा भाजपमध्ये प्रवेश; अनेक जण रांगेत, मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

निरंजन डावखरेंचा भाजपमध्ये प्रवेश; अनेक जण रांगेत, मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Published On: May 24 2018 11:38AM | Last Updated: May 24 2018 11:38AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

अॅड. निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पक्षात गुरुवारी प्रवेश केला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. डावखरे यांनी दोन दिवसांपूर्वीच कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्याच पाठोपाठ  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. डावखरे यांच्या प्रवेशावेळी भाजपमध्ये येण्यास खुप जण रांगेत असल्याचे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

काय म्हणाले निरंजन डावखरे

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास
शरद पवार मोठे नेते, पण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे