Thu, Aug 22, 2019 04:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा राहुल गांधी करणार; नीलेश राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा राहुल गांधी करणार; नीलेश राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

Published On: Jun 13 2019 10:45AM | Last Updated: Jun 13 2019 10:49AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यासाठी मातोश्रीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा पण राहुल गांधी करणार. देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये, अशा शब्दांत नीलेश राणे यांनी टीका केली आहे. 

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती.

या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.