Tue, Feb 18, 2020 12:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत २६ जानेवारीपासून सुरू होणार नाईट लाईफ

मुंबईत २६ जानेवारीपासून सुरू होणार नाईट लाईफ

Last Updated: Jan 18 2020 1:36AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी
येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील रहिवासी भागात हॉटेल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले राहणार आहेत. नरिमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊंड भागात याची सुरुवातीला अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

नाईट लाईफ केवळ रहिवासी भागातच प्रायोगिक तत्त्वावर सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नाही, असा दावाही ठाकरे यांनी केला. सध्या अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणार्‍यांना मुंबई शहर मागे राहावे असे का वाटत आहे, असा सवालही त्यांनी केला. या निर्णयामुळे हॉटेल, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी निवासी भागात 24 तास हॉटेल, पब सुरू ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे.