Tue, Nov 20, 2018 11:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुम्ही रात्रपाळी करताय?; सावधान!

तुम्ही रात्रपाळी करताय?; सावधान!

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 7:47AMवॉशिंग्टन : वृत्तसंस्था

रात्रपाळीत काम करणारांसाठी धोक्याचा इशारा देणारी बातमी आहे. रात्रपाळी केल्याने कन्सर, हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार होऊ शकतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. यासंदर्भात वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने हे प्रयोगाअंती सिद्ध केले आहे. हे संशोधन मूळ भारतीय असलेल्या वैज्ञानिक प्रोफेसर शोभन यांच्या टीमने केलेले आहे. रात्रपाळीत काम केल्याने वजन वाढणे, डायबेटीस यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात व पर्यायाने हार्ट अटॅक, कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

दिवसा व रात्री केलेले काम हे मेंदूवर अवलंबून असते. शरीरातील लिव्हरमध्ये होणार्‍या वेगवेगळ्या जैविक क्रियांवरून मेंदूमध्ये वेळ ठरवून दिलेली असते. शरीराचे घड्याळ (बॉडी क्‍लॉक) व मेंंदूचे घड्याळ (ब्रेन क्‍लॉक) यांचा परस्पर असा जवळचा संबंध असतो. यासंदर्भात संशोधक हॅन्स वॅन डोंगन म्हणाले की, रात्रपाळीत काम केल्याने शरीरातील पचनशक्तीवरही परिणाम होतो. याबरोबरच याचा मेंदूवरही परिणाम होतो. पर्यायाने शरीराचे घड्याळ व मेंदूचे घड्याळ यांंचे संतुलन बिघडून पचनशक्तीवर परिणाम होतो व पचनातून शरीराला मिळणार्‍या ऊर्जेवरही त्याचा परिणाम होतो. 

यासंर्भात प्रोफेसर शोभन यांच्या म्हणण्यानुसार, रात्रपाळीत काम करणे यावर संशोधन हे महत्त्वाचे आहे. रात्रपाळीत काम केल्याने याचा परिणाम किडनीवरही होतो व त्यामुळेही आजाराच्या गंभीर समस्या उद्भवतात.रात्रपाळीमुळे स्तनाचा कन्सर, त्वचेचा कन्सर, पूर:स्त कॅन्सर (प्रोस्टेस्ट कॅन्सर)  असे आजारही होऊ शकतात.

लाईट सिगारेट पिणे जास्त धोकादायक

सिगारेट पिणे तसे आरोग्यासाठी अपायकारकच आहे. मात्र, लाईट सिगारेट प्यायल्याने शरीराला कमी धोका होईल, सिगारेट पितानाही हलके वाटते म्हणून अनेकदा व्यसन करताना लाईट सिगारेट पिणे पसंत केले जाते. मात्र, सर्वसाधारण सिगारेटच्या तुलनेत लाईट सिगारेट पिणे हे जास्त धोकादायक आहे. या सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. कारण लाईट सिगारेटच्या धुरात स्टारचे प्रमाण सर्वसाधारण सिगारेटमधील धुरापेक्षा कमी असते. असे असले तरी ते शरीरासाठी जास्त धोकादायक असते व त्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोक असतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिगारेटनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनी कितीही सुरक्षेचे दावे केले, सिगारेटला फिल्टर चांगले लावले असले तरी सिगारेट पिणे हे शरीरासाठी धोकादायक असल्याचे मशिनद्वारे केलेल्या संशोधनातूनही सिद्ध झाले आहे.