होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘निफ्टी’चा ऐतिहासिक विक्रम, ‘सेन्सेक्स’ची 'बुल रन' सुरूच

‘निफ्टी’चा ऐतिहासिक विक्रम, ‘सेन्सेक्स’ची 'बुल रन' सुरूच

Published On: Jan 23 2018 9:49AM | Last Updated: Jan 23 2018 9:52AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मंगळवारी सकाळी बाजार सुरू होताच 11 हजारांचा टप्पा पार केला. ‘निफ्टी’ बरोबरच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने देखील 36 हजारांचा टप्पा ओलांडला. आशियाई बाजारपेठीतील तेजीमुळे भारतीय बाजारपेठेत देखील त्याचे परिणाम दिसत आहेत. 

मंगळवारी सकाळी निफ्टीमध्ये 48.80 अंकांची वाढ होत तो 11 हजार 015 अंकांवर पोहोचला. तर सेन्सेक्समध्ये देखील 175.68 अंकांची वाढ होत त्याने 36 हजारांचा टप्पा पार केला. 

आशियातील सर्व बाजारपेठेत एक टक्का वाढ पाहायला मिळत आहे.