Fri, Feb 28, 2020 17:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन नववर्षाची सुरुवात! 

सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन नववर्षाची सुरुवात! 

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:44AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

 नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या आरंभाला प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. रात्रीपासून ते सोमवारी रात्रीपर्यंत तब्बल दहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली.  
नवीन वर्षात स्वप्न,आकांक्षांची, इच्छांची पूर्ती व्हावी, असे साकडे घालणार्‍या लाखो भाविकांसाठी सिद्धिविनायक मंदिरात थर्टीफर्स्टच्या रात्री गर्दी केली होती. नववर्षाच्या निमित्ताने 1.30 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. नववर्षाचा जल्‍लोष साजरा केल्यानंतर मध्यरात्रीपासून भाविकांचे जथ्थे सिध्दिविनायकाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आले होते. रात्री 12 वाजता मंदिरात अभिषेक होऊन आरतीनंतर रात्री दीड वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. 

नव्या वर्षाची सुरुवात ही सिध्दिविनायकाच्या दर्शनानेच करण्याचा निर्धारच भाविकांचा केल्याने रात्री 10  वाजल्यापासून मंदिर परिसरात दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. पहाटेच्या बोचर्‍या थंडीची तमा न बाळगता गणपती बाप्पा मोरयाच्या गजर करत मुंबई आणि उपनगरातील भाविक मोठ्या संख्येन दाखल होत होते. महिला भाविकांची संख्याही मोठी होती. मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक,भक्‍तांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी सांगितले. 

संजीव पाटील म्हणाले की, रविवारची सुट्टी असल्याने सायंकाळपासून दक्षिण मुंबईत भाविक दाखल झाले होते. त्यामुळे रात्रीपासून मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लावल्या होत्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे आठ ते 9 लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्री दहा वाजता मंदिर बंद होईल. भाविकांना झटपट दर्शन घेऊन मोकळे होता येईल यासाठी हार, फुले, नारळ वाहन्यास बंद करण्यात आले होते.