Thu, Nov 15, 2018 16:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रेंच्या वडिलांचा मंत्रालयात आत्‍मदहनाचा इशारा

अश्विनी बिद्रेंच्या वडिलांचा मंत्रालयात आत्‍मदहनाचा इशारा

Published On: Apr 19 2018 5:31PM | Last Updated: Apr 19 2018 5:31PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

सहाय्‍यक पोलिस निरिक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्‍या होउन दोन वर्षे होत आली तरी अजूनही आरोपींना शासन झालेले नाही. वेळीच तपास केला असता, तर आज ही वेळ आली नसती. आम्‍हाला न्यायासाठी अजुनही झगडावे लागत आहे. त्‍यामुळे कुठल्‍याही क्षणी आपण मुख्यमंत्री कार्यालयात आत्‍मदहन करू असा इशारा अश्विनी बिद्रेंचे वडील जयकुमार बिद्रे यांनी दिला. यामुळे राज्याच्या गृहखात्‍याची झोप उडाली आहे.

अश्विनीचे वडील माजी सैनिक जयकुमार बिद्रे यांनी मुलगीबाबत न्याय मिळत नसल्याने मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी पत्र 17 एप्रिल रोजी मुख्यमंत्री कार्यालयाला दिले आहे. यामुळे नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.