Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोरिवली ते वसईचा प्रवास होणार जलद

बोरिवली ते वसईचा प्रवास होणार जलद

Published On: Dec 11 2017 11:32AM | Last Updated: Dec 11 2017 11:32AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बोरिवलीपासून वसईकडे जाणार्‍यांचा प्रवास आता वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) मीरा-भाईंदर- वसई- नायगाव जोडण्यासाठी पाच किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. या पूलाचे काम मार्च 2018 सालामध्ये सुरू करण्यात येणार आहे. हा पूल भाईंदर पश्‍चिम ते नायगाव येथील संत जलाराम नगरपर्यंत बांधण्यात येणार आहे. यामुळे बोरिवलीवसईपर्यंतचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.

वसई-विरारच्या दिशेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना पश्‍चिम दृतगती मार्गावरून प्रवास करावा लागतो. यामार्गावर आता मेट्रो-7 मार्गिकेचे काम सुरू असल्याने या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना खूपच त्रास सहनकरावा लागतो. या मार्गावर प्रवास करताना एक ते दीड तास लागतो. हा पाच किलोमीटर लांबीचा पुल झाल्यावर हा पुल नंतर मीरा- भाईंदर लिंक रोड आणि दहिसर लिंक रोडला जोडण्याचा विचार आहे.

हा पूल बनवण्यासाठी सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्या आहेत. हा पूल बांधण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया जानेवारी 2018 साली काढण्यात येणार आहेत. ही निविद प्रक्रिया मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर डिसेंबर 2019 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईवरून विरारकडे जाण्यासाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. रेल, असे एमएमआरडीएच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडीवरही उतारा मिळणार आहे.