Wed, Nov 21, 2018 19:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नेदरलँडच्या राणींनानाही डबेवाल्यांचे आकर्षण (Video)

नेदरलँडच्या राणींनानाही डबेवाल्यांचे आकर्षण (Video)

Published On: May 30 2018 8:16PM | Last Updated: May 30 2018 8:16PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईच्या डबेवाल्यांनी जगभरात आपली विशेष ओळख निर्माण केल्याची चर्चा नवी नाही. या डबेवाल्यांच्या लोकप्रियतेचा आणखी किस्सा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बुधवारी  नेदरलँडटच्या राणी मॅक्झिमा यांनी डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले.  

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी २ वाजता राणी मॅक्झिमा आपल्या ताफ्यासह डबेवाल्यांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाले. राणींनी डबेवाल्यांशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डबेवाल्यांनी त्यांना  डब्यांची प्रतिकृती भेट दिली.

मुंबईतील डबेवाल्यांचे नियोजनबद्ध काम कसे चालते, याची माहिती देखील मॅक्झिमा यांनी जाणून घेतली. संस्थेचे सचिव विठ्ठल सावंत यांनी राणींना आपल्या कामाची सविस्तर माहिती दिली. ब्रिटनच्या रॉयल घराण्यानंतर आता नेदरलँडच्या राणीचांही डबेवाल्यांसाठी एक नाते जोडल्याचे पाहायला मिळाले.