Tue, Jul 16, 2019 12:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव कारवाईच्या जाळ्यात

नीरव कारवाईच्या जाळ्यात

Published On: Feb 17 2018 2:14AM | Last Updated: Feb 17 2018 2:13AMमुंबई/नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय आणि आयकर विभागाने कंबर कसली आहे.

विदेशात बेकायदेशीर संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून आयकर विभागाने त्याच्याविरुद्ध काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय विभागाने नीरव मोदी, त्याचे कुटुंबीय आणि कंपन्यांच्या 29 मालमत्ता आणि 105 बँक खाती जप्त केली आहेत.

मकाऊ, बिजींग, न्यूयॉर्क आणि लंडन येथील दुकानांतून एकही हिरा विकला जाता कामा नये, असे आदेश ईडीने नीरव मोदीच्या कंपनी मुख्यालयाला दिले आहेत. सध्या त्याच्या विविध कंपन्यांचेमूल्य सहा हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

नीरवसह त्याचा व्यावसायिक भागीदार मेहूल चोक्सीचे पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून तात्पुरते रद्द करण्यात आले असून याप्रकरणी उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.सीबीआयने नीरव मोदीचा काका असलेल्या चोक्सीच्या गीतांजली ग्रुपविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला आहे. नीरव मोदी आणि चोक्सी यांना ङ्गईडीफने मनी लाँडरिंग अ‍ॅक्टनुसार समन्स बजावले असून एका आठवड्यात हजर राहण्यास सांगितले आहे. ङ्गईडीफच्या मागणीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी मोदी आणि चोक्सीचे पासपोर्ट चार आठवड्यांसाठी रद्द केेले आहेत. नीरव मोदी जानेवारीतच भारतातून पसार झाला होता. तो सध्या कुठे आहे, याचा शोध सीबीआयतर्फे घेतला जात आहे.

सीबीआयकडून आणखी एक गुन्हा 

ङ्गपीएनबीफने केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सीबीआयने या प्रकरणात आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा मेहूल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. 13 जानेवारी रोजी ङ्गपीएनबीफने 4,886 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल केली होती. सीबीआयने शुक्रवारी गीतांजली ग्रुपच्या पुणे, मुंबई, सुरत, जयपूर, हैदराबाद आणि कोईमतूर येथील कार्यालयांवर धाडी टाकल्या. 

गीतांजली ग्रुपचे इतर संचालक, कंपन्या, कार्यालये तसेच निवासस्थानी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने दिली.

पीएनबीफही संशयाच्या भोवर्‍यात

दरम्यान, याप्रकरणी ङ्गपीएनबीफने सीबीआयकडे तीन टप्प्यात का तक्रार दाखल केली, याबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे. तीन तक्रारींमध्ये एकूण 150 बोगस एलओयू दिल्याचे बँकेने म्हटले आहे. ङ्गपीएनबीफने पहिली तक्रार 280 कोटींच्या घोटाळ्याची दिली होती. त्यानुसार सीबीआयने नीरव मोदी, त्याची पत्नी अमी, भाऊ निशाल आणि चोक्सीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने आणखी एक तक्रार दाखल करून हा घोटाळा 11 हजार 500 कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले होते.