Mon, Jan 21, 2019 19:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; सावत्र आईवर नराधमाचा बलात्कार

धक्कादायक; सावत्र आईवर नराधमाचा बलात्कार

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMखानिवडे : प्रतिनिधी

विरार पोलीस ठाण्या अंतर्गत मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 25 वर्षांच्या मुलाने सावत्र आईला बेदम मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात (14 फे ब्रुवारीला) घडली. मांडवी पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या. पीडित आदिवासी महिलेच्या पतीचे महिनाभरापूर्वी निधन झाले. यानंतर व्यवहाराच्या भांडणामुळे मुलगा व सावत्र आईमध्ये दुरावा निर्माण झाला. यामुळे त्या दोघांमध्ये नेहमी शिवीगाळ व भांडणे व्हायची.

14 तारखेला दुपारी पीडित महिला शेतात काम करत असताना आरोपीने तेथे येऊन भांडण उकरून काढले. त्याने आईला दांडक्याच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर शेतातील झोपड्यात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जबर मानसिक धक्का बसलेल्या पीडितेची तब्येतही बिघडली. सावत्र मुलाची तक्रार कशी करायची, याची चिंता तिला सतावत होती. मात्र, तरीही तिने मन खंबीर करून मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सावत्र मुलाच्या मुसक्या आवळल्या. मालमत्तेच्या वादाचा  बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले.