होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळ वॉर्डबाहेर गेल्यामुळे नायरच्या दोन महिला रक्षक निलंबित

बाळ वॉर्डबाहेर गेल्यामुळे नायरच्या दोन महिला रक्षक निलंबित

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

हॉस्पिटलमधून होणार्‍या नवजात बाळांच्या चोरीप्रकरणी पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केलेले असताना, पुन्हा एकदा नायर हॉस्पिटलमधील बाळाला वॉर्डबाहेर नेल्याची घटना निदर्शनास आली आहे.या बाळाच्या नातेवाइकांना दरवाजावर रोखण्यात न आल्याचा ठपका ठेवून, सुरक्षा दोन महिला सुरक्षा जवानांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात सोमवारी नवजात बाळाला वॉर्डाबाहेर नेण्यात आले. परंतु याची कोणतीही कल्पना विभागातील नर्स आणि डॉक्टर यांना नव्हती. त्यामुळे बाळाचा शोध सुरू झाला, परंतु त्यांनतर नातेवाईकच बाळाला घेऊन, पुन्हा वार्डात दाखल झाले. त्यामुळे बाळाला वॉर्डाबाहेर नेलेच कसे, यावेळी सुरक्षा रक्षक यांनी त्यांना रोखले का नाही. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, येथील तैनात महिला सुरक्षा जवान या गप्पा मारत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन्ही महिला सुरक्षा जवानांना त्वरित सेवेतून निलंबित करण्यात आले. 

प्रसूती विभागातून कोणतेही बाळ बाहेर नेताना, त्याची सुरक्षा रक्षकांकडून नोंद ठेवली जाते. परंतु या विभागातून बाळाला बाहेर घेऊन जात असताना, सुरक्षा जवानांनी त्यांना विचारले नाही. एवढेच नाही तर त्यांची नोंद घेतली नाही. त्यामुळे कर्तव्यकसूर केल्याप्रकरणी दोन महिला सुरक्षा कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले असल्याचे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी सांगितले. बाळ बाहेर नेले जाते हे सुरक्षा रक्षकांना माहीत नसणे हे गंभीर आहे. त्यामुळे या दोन्ही सुरक्षा रक्षकांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.