Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई देशात सर्वोत्तम!

घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई देशात सर्वोत्तम!

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 1:57AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये  घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबईला घोषित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये मध्ये इंदौर, भोपाळ व चंदीगढ या तीन शहरांना देशातील सर्वात स्वच्छ शहरांचा अनुक्रमे बहुमान मिळाला. तसेच इतर शहरांना स्वच्छतेच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये नवी मुंबई पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन 10 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या मोठ्या महानगरांमध्ये देशात सर्वोत्तम असल्याचे घोषित करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला सामोरे जाताना माझा कचरा - माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. त्याचीच पावती या बहुमानाने मिळाली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी - कर्मचार्‍यांनी स्वच्छ सर्वेक्षणाचे काम झोकून देऊन केले होते. रोज घरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला व सुका असे घरातच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देण्याचे प्रमाण नवी मुंबईत 85 टक्के इतके गाठण्यात यश लाभले असून हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. हा वर्गीकृत साधारणत: 750 मेट्रिक टन कचरा रोज पालिकेच्या पर्यावरणशील शास्त्रोक्त भू-भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे वाहून नेला जात आहे.