Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते

नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:15AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

येत्या 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.  1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारले जाणार असून एकूण चार टप्प्यात विमानतळाच्या कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचे काम सिडकोने हाती घेतले असून तीन वर्षाच्या अंतराने हे चार टप्पे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सिडको मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

या विमानतळासाठी चौदा सिडकोच्या आजी-माजी चौदा व्यवस्थापकीय संचालकांनी वेगवगेळ्या टप्प्यात कामे करुन परवानग्या मिळविल्या. विमानतळाच्या कामासाठी आतापर्यंत सिडकोत आलेल्या आजी व माजी 14 एमडीनी प्रयत्न केले होते. त्यापैकी जी.एस.गिल, तानाजी सत्रे, संजय भाटीया आणि विद्यमान व्यवस्थाकीय संचालक भूषण गगराणी यांनी हे काम पुर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या याच एमडीच्या काळात सिडकोने प्राप्त केल्या.

विमानतळ कामासाठी येणार्‍या अडचणींना सामोरे जाणारे सिडको एमडी गगराणी यांनी  प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करून त्यांना 2014 च्या पुनर्वसन आणि पुनर्वसन स्थापना धोरण कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 12 गावातील 3500 कुटुंबांपैकी सध्या 500 कुटुंबांचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना घराच्या छप्पराच्या तिप्पट आकाराचा क्षेत्रफळ असलेले भूखंड वडघर, वहाळ आणि कुंडेवहाळ याठिकाणी देण्यात आले. त्यासाठी ऑनलाईन लॉटरी पध्दतीने सिडकोत सोडत काढण्यात आल्या. 

नवी मुंबईतील या विमानतळ उभारणीसाठी एकूण 1160 हेक्टर जागा लागणार असून त्यासाठी 16 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचे वर्गीकरण केले आहे. प्रत्येक टप्प्यासाठी चार ते साडेचार हजार कोटी रुपये खर्च असून तीन वर्षाच्या अंतराने प्रत्येक टप्पा पूर्ण होणार आहे.  पहिला टप्पा डिसेंबर 2019 ला पूर्ण होणार असून पहिले विमान टेकऑफ होणार आहे.

हे काम  जी.व्ही.के इंन्फ्राटॅ्रक्‍चर, गायत्री इंन्फ्रो प्रोजेक्ट, जे.एम.म्हात्रे आणि टीजीपीएल या कंपन्यांना दिले आहे. त्यामध्ये  डोंगराचे सपाटीकरण करणे, भराव टाकून जमीन सपाट करणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणे या कामांचा समावेश आहे. सिडकोने चार टप्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा आहे. दुसर्‍या टप्प्यात टप्पात अडीच कोटी आणि 2025 पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करीत एकूण 6 कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.