Wed, Mar 27, 2019 00:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई पालिकेवर ‘आयकर धाड’

नवी मुंबई पालिकेवर ‘आयकर धाड’

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:57AM

बुकमार्क करा
नवी मुंबई : प्रतिनिधी 

महपालिका मुख्यालयात मंगळवारी आयकर विभागाने धाड टाकली. यावेळी नेमकी ही धाड कुठल्या विभागाशी संबंधित होती, याची कुणालाही कुणकुण नसल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. हे धाडसत्र जीएसटीबाबत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पथकाने सात विभागातील शंभर कोटींच्या झालेल्या कामांची छाननी केली. यावेळी बारा कंत्राटदार आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. त्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत. 
जीएसटी बाबत आयकर विभागाच्या 12 अधिकार्‍यांनी मंगळवारी  सकाळी महापालिकेच्या अकाउंट्स विभाग, नगररचना विभाग आणि शहर अभियंता विभागावर धाडी घातल्या. बुधवारी रात्री तीन वाजेपर्यंत फाईलीची तपासणी सुरू होती. मुख्य लेखा व वित्त विभागापासून आयकरच्या पथकाने कागदपत्रे तपासण्यास सुरूवात केली होती. 

सुरूवातीला 10 लाखापर्यंत केलेल्या कामांच्या फाईली तपासल्या. मात्र नंतर 100 कोटींच्या वरील कामांच्या सर्व फायलींची तपासणी करण्यात आली. मंगळवारी  सकाळ पासून बुधवारी पहाटे पर्यंत तपास सुरू होती. महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना म्हणजे एचओडींना मेसेज पाठवून कुणीही घरी जाणार नाही. असा निरोप यावेळी देण्यात आल्याचे समजते. ज्या विभागात 100 कोटींची कामे झाले आहेत असे विभाग आणि काम करणारे  महापालिकेचे मोठे ठेकेदार आणि अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत, असे समजते.