Fri, Nov 16, 2018 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळाचा सामंजस्य करार

नवी मुंबई विमानतळाचा सामंजस्य करार

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:15AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सर्वच पातळीवर मोठ्या गतीने सुरू असून बुधवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्यात बुधवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंबंधीच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

या सामंजस्य करारला केंद्राकडून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, एनएमआयएएलचे अध्यक्ष, जीव्हीके रेड्डी यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.

यावेळी झालेल्या विमानतळ करारादरम्यान घेण्यात आलेल्या आढाव्यात महत्त्व पूर्ण चर्चा झाल्याची माहिती सिडकोने दिली. नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक संस्थेकडून विविध राखीव सेवा, जसे सीएनएस, एटीएम सेवा, कस्टम नियंत्रण, इमिग्रेशन सेवा, प्लान्ट क्वारन्टाइन सेवा, निमल क्वारन्टाइन सेवा, आरोग्य सेवा, हवामानविषयक सेवा, सुरक्षा सेवा यांचा सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारानुसार सदर राखीव सेवा सुरळीतपणे व कार्यक्षमतेने मिळाव्यात याकरिता सर्व संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

करारनामा झाल्यापासून 180 दिवसांच्या आत कंपनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात करेल. विमानतळ गाभा क्षेत्रात एप्रिल 2017 पासून सुरू झालेली भूविकास कामे सवलतधारक कंपनीबरोबर नोव्हेशन करारनामा करून कंपनीची नेमणूक झाल्याच्या तारखेपासून कंपनीस हस्तांतरित करण्यात येतील.  

सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याकरिता कंपनीची निवड करण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज पाहणार्‍या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एमआयएएल) या कंपनीची निवड करण्यात आली व त्यास राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली. एमआयएलने विशेष हेतू वाहन (एसव्हीपी) म्हणून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) ही सवलतधारक कंपनी म्हणून अंतर्भूत केली आणि प्रकल्पातील 26% समभाग सिडकोला हस्तांतरित केले. 8 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सवलत करारनामा, राज्य शासन पाठिंबा करारनामा व भागधारकांचा करारनामा करण्यात आला होता.

Tags : mumbai, mumbai news, Navi Mumbai, Airport, Reconciliation, agreement,