Wed, Mar 27, 2019 04:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील नवरंग स्‍टुडिओला लागलेली आग अटोक्‍यात

मुंबईतील नवरंग स्‍टुडिओला लागलेली आग अटोक्‍यात

Published On: Jan 19 2018 7:49AM | Last Updated: Jan 19 2018 7:49AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील लोअर परेलमधील टोडी मिल्‍स कम्‍पाऊंडमध्ये असणार्‍या नवरंग स्‍टुडिओला रात्री एक वाजता आग लागली. पहाटे पाच वाजता ही आग अटोक्यात आणण्यात आली. स्‍टुडिओच्या चौथ्या मजल्‍यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ही आग अटोक्यात आणण्यात आली. फायर बिग्रेडच्या बारा गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या होत्या. आग लागल्यानंतर पाण्याचे सात टँकर, एक रुग्णवाहिका घटनास्‍थळी दाखल झाल्‍या. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही आग अटोक्यात आणताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. नवरंग स्‍टुडिओ जुन्या इमारतीमध्ये होता. हा स्‍टुडिओ काही वर्षांपासून बंद अवस्‍थेत होता.