Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्य परिषदेवर झेंडा कुणाचा?

नाट्य परिषदेवर झेंडा कुणाचा?

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : संजय कुळकर्णी    

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक उद्या रविवारी होत आहे. निवडणुकीसाठी गेला महिनाभर सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप झाले. रंगकर्मींनीही ते चवीने वाचले. पण कोणीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे उत्तर मतांमार्फत देणार हे आता उघड आहे.कोण निवडून येणार त्यापेक्षा नाट्य परिषद कात कधी टाकणार, या प्रश्‍नापोटी मतदार मतदानासाठी उतरतील असा अंदाज आहे. प्रायोगिक, हौशी रंगभूमीवरील रंगकर्मी मोठ्या संखेने मतदानासाठी उतरतील असा जाणकार रांचा होरा आहे.

मी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीरपणे म्हणणार्‍या मोहन जोशी यांना पुन्हा अध्यक्षपदाचे डोहाळे लागलेले दिसतात. नाट्यक्षेत्रात असलेला निर्माता संघाचा वाद काहीजण या निवडणुकीतसुद्धा उगाळताना दिसले. महाराष्ट्रातून जे उमेदवार बिनविरोध निवडूून आले आहेत, असा दावाही काहीजणांकडून केला जात आहे. नाट्य परिषदेवर झेंडा कुणाचा? हे अधिकृत बुधवारी समजेल. यश अपयशाची तमा न बाळगता निवडून आलेले उमेदवार एकत्र येतील आणि ज्यांना अध्यक्ष बनायचे आहे त्यांना निवडूनही देतील. रंगकर्मींना त्याची सवय झाली आहे. काहीही होवो कोणीही निवडून येवो, प्रायोगिक नाट्यगृह उभारले जावो , नाट्य परिषद बहरो आणि शासनाने दिलेला निधी रंगकर्मींसाठीच  खर्च होवो, तो कार्यालयासाठी खर्च न होवो हेच अपेक्षित आहे.