Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट!

पालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट!

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीनंतर फूट पडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिका सभागृहातही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व वरिष्ठ नेते नवाब मलिक यांचे दोन गट दिसून येतात.  बुधवारी हे प्रकर्षाने जाणवले. मलिक यांच्या भाऊ व बहिणीने आपल्या पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात न घेता, थेट पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे उघड झाले आहे.

पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 9 नगरसेवक आहेत. यात आठ महिला व एक पुरूष नगरसेवक आहे. पालिका निवडणुकीनंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घाटकोपरच्या नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे पालिकेतील पक्षाचे गटनेते पद सोपवले. 

जाधव यांना हे पद सोपवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुर्ला येथील ज्येष्ठ नगरसेवक कप्तान मलिक व डॉ. सईदा खान यांच्यात नाराजी पसरली होती. त्यामुळे गटनेत्या जाधव व मलिक व खान या दोन नगरसेवकांचे फारसे पटत नसल्याचे बोलले जात आहे.

पालिका सभागृहात पक्षाचा गटनेता म्हणून जाधव यांना विश्वासात न घेता, डॉ. सईदा खान व कप्तान मलिक स्वत:चे विषय लावून धरतात.