मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधार्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबरपासून सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा दोन एप्रिलपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने 12 एप्रिलपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून भाजप आणि शिवसेनेविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसर्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसर्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर हुरूप वाढलेल्या राष्ट्रवादीने आता आपल्या बालेकिल्ल्यात ताकद लावली आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यास सरकारला आलेले अपयश, कृषी वीज बिले, नोटा बंदीनंतर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे झालेले हाल, मागास घटकातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष इत्यादी मुद्द्यांवर राष्ट्रवादी सरकारविरोधात वातावरण तयार करणार आहे.
mumbai news, Nationalist Congress Party, Attacking movement
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM