Sun, May 31, 2020 19:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘साहब, आपको मेडल जरूर मिलेगा’

‘साहब, आपको मेडल जरूर मिलेगा’

Published On: Dec 18 2017 1:31PM | Last Updated: Dec 18 2017 1:31PM

बुकमार्क करा

ओझर : मनोज कावळे

साहब, आपने बहोत बडा  काम किया है, आपको मेडल जरूर मिलेगा, हे उद‍्गार आहे चांदवड येथील शस्त्रसाठा प्रकरणात ताब्यात  घेतलेल्या मुख्य संशयिताचे. पोलीस  अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला संशयिताकडून हे एकच उत्तर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे राज्याला हादरवून सोडणार्‍या या प्रकरणाच्या  तपासाकामी ओझरमध्ये तीन दिवसांपासून तळ ठोकून असणारी तपास यंत्रणा संभ्रमात पडली असून, या प्रकरणातील सत्यता बाहेर येण्यास उशीर होत आहे. मालेगाव  येथील  पेट्रोल पंपचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून पोबारा करणार्‍या तीन  संशयितांना चांदवड येथील टोल नाक्यावर पकडण्यात आले होते.

या संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्यात  आल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यातील मुख्य संशयित  द्रीनुजमान  कबर बादशाह ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाचा याला ओझर येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. हा मुख्य संशयित सराईत गुन्हेगार असून, राज्यातल्या विविध  पोलीस ठाण्यांत त्याच्यावर  अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, देशभरातल्या  तपासयंत्रणा खडबडून जाग्या झाल्याआहेत. म्हणून या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी मुख्य तपास यंत्रणा तीन   दिवसांपासून ओझर येथेच तळ ठोकून आहेत.  गंभीर घटनेची विविध अंगाने सध्या वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असून, या चौकशीबाबत मोठी गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

चांदवड शस्त्रास्त्र जप्‍तीप्रकरणी फरार आरोपींपैकी बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका (27) शनिवारी मध्यरात्री मुंबईच्या शिवडी भागातून अटक करण्यात आली. त्यास रविवारी चांदवड न्यायालयात न्यायाधीश के. जी. चौधरी यांनी 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. तपास यंत्रणाही चक्रावली प्रत्येक अधिकारी या मुख्य संशयिताची  कसून चौकशी करीत आहे. प्रत्येकाकडून वेगवेगळे प्रश्‍न विचारले जात असले तरी हा संशयित ‘साहब, आपने बहोत बडा काम किया है, आपको मेडल जरूर मिलेगा’, हे एकच  उत्तर  येत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावली आहे.

उत्तर प्रदेशातील चोरलेला शस्त्रसाठा नेमकी कोणत्या उद्देशासाठी लुटला यांची उकल अद्यापही झालेली नाही आहे. या  स्त्रसाठ्यातून मुंबईला दहशतवादी हल्ला करण्याचा इरादा होता का, अटक केलेल्या बादशहाची टोळी नेमकी चोरी करणारी आहे की त्यांचे दहशदवादी संघटनेशी संबंध आहे, संदर्भात अद्यापही पोलिसांनी खुलासा केलेला नाही. त्यामुळे  या प्रकरणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.