Mon, Aug 19, 2019 05:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नरिमन पॉईंटला विदेशी तरुणाची आत्महत्या

नरिमन पॉईंटला विदेशी तरुणाची आत्महत्या

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील रोमानियन दुतावासाकडे मदत मागण्यासाठी गोव्यातून आलेल्या 32 वर्षीय रोमानियन तरुणाने नरीमन पॉईंट परिसरातील मेकर चेंबर इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून घटनेची नोंद करत कफ परेड पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरुण गोव्यामध्ये वास्तव्यास होता. स्वत जवळील पैसे संपल्यामुळे मुंबईतील रोमानियन दुतावासाकडून मदत मिळेल या आशेपोटी त्याने मुंबई गाठण्याचे ठरविले. त्याने गोव्यातील नागरीकांकडे मदत मागून पैसे गोळा करत एका खाजगी ट्रॅव्हल्सने मगंळवारी मुंबई गाठली. नरीमन पॉईंट येथील मेकर चेंबर्समध्ये रोमानियन दूतावासाचे कार्यालय असून ते आपल्याला मदत करतील अशी खात्री पटल्याने तो मंगळवारी रात्री येथे फिरत होता.

एका स्टॉलवर सॅण्डवीच आणि पाण्याची बॉटल त्याने खरेदी केली. मात्र, आपल्याला काहीच मदत मिळत नसल्याने नैराश्याने ग्रासलेल्या या तरुणाने सकाळी अकराच्या सुमारास इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. 

Tags : Mumbai, mumbai news, foreign youth, suicide, Nariman Point,