Fri, Apr 26, 2019 20:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदींच्या योजना 'पेंढा' भरलेलं बाहुलं, राज ठाकरेंचा टोला

मोदींच्या योजना 'पेंढा' भरलेलं बाहुलं, राज ठाकरेंचा टोला

Published On: Feb 13 2018 8:00AM | Last Updated: Feb 13 2018 8:15AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ओठातून निघलेला 'जुमलेबाजी' या शब्दाचा आधार घेत मोदी हे फक्त घोषणाबाजी करतात. तसेच योजना फसव्या असल्याचे सांगत मोदी जाहिरातबाजी करण्यात अव्वल असल्याची खोचक टिका राज ठाकरे यांनी  व्यंगचित्रातून केली आहे. 

'अहो कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना'  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. यात मनमोहन सिंग यांच्या तोंडी मोदीजी नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय असे शब्द राज ठाकरेंनी चपकळपणे बसवले आहेत. 

देशाच्या प्रगतीमध्ये आजवरच्या सरकारचा 'हात' आहे, असे मी अभिमानाने कबूल करतो. लाल किल्ल्यावरुन देखील मी असे सांगितले आहे, अशा शब्दांत  काँग्रेसला विकासाचे श्रेय देत  काँग्रेस माझ्यासारखा उदारपणा दाखवणार का? असा प्रश्न मोदी उपस्थित करत असल्याचा उल्लेख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केला आहे. व्यंगचित्रात मोदी योजनारुपी गाडा ढकलताना दाखवण्यात आले आहे. पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचे विशेषण लावून मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दिसते. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीं भाषेत राज ठाकरेंनी मोदींचा समाचार घेतला आहे.