Wed, Jul 17, 2019 00:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकर्‍यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांची नार्को टेस्ट करा

शेतकर्‍यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांची नार्को टेस्ट करा

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:11AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात कीटकनाशक फवारणी करताना शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास  संबंधित शेतकर्‍यावरच 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार्‍या पोलीस अधिकार्‍याची नार्को टेस्ट करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

कमला मिल आगप्रकरणी वन अबव्ह व मोजोज बिस्ट्रोचे मालक, मिलचे भागीदार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी ठपका ठेवलेल्या सर्व मनपा अधिकार्‍यांचीही अशा प्रकारची चाचणी करावी, अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली आहे. 

यवतमाळ  व इतर जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व मजूर मृत्यू पावले होते.याप्रकरणी स्थापन झालेल्या एसआयटीच्या अहवालावर विखे पाटील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, हे सरकार कंपन्यांना सोडून निर्दोष शेतकर्‍यांना फासावर चढवायला निघाले आहे. सरकारने दोषी कंपन्यांविरुध्द 304 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यापलिकडे काहीही केलेले नाही. शेतकर्‍यांवर दोषारोपण करताना एसआयटीने सरकारी अधिकारी आणि महिको, मोन्सॅन्टोसारख्या मोठ्या कंपन्यांना या संपूर्ण प्रकरणातून सहिसलामत बाहेर काढले आहे. कीटकनाशकांच्या वापरासाठी कंपन्यांनी आणि कृषी विभागाने शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायचे होते. ते त्यांनी दिले नाही. पण त्याचा उल्लेखही या अहवालात नाही. त्यामुळे सरकारने हा अहवाल कचरापेटीत टाकावा. तसेच या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून नव्याने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.