Wed, Apr 24, 2019 21:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

Published On: Jun 07 2018 3:13PM | Last Updated: Jun 07 2018 3:13PMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. नारायण राणे यांनी वांद्रयातील एमईटी संस्‍थेत भुजबळ यांची भेट घेतली

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ आणि राणे यांची भेट झाली. सुमारे अर्धातास त्यांच्यात चर्चा झाली. परंतु, कोणत्या मुद्यावर त्यांच्यात चर्चा झाली हे अद्याप समजले नाही. 

दरम्यान, आजारपणातून बाहेर आलेल्या भुजबळ यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली. आता खुद्द नारायण राणे यांनीही भुजबळांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजते. राणे आणि भुजबळ यांच्या भेटीची मात्र, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.