Wed, Nov 21, 2018 07:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारची चर्चा ग्रामस्थांशीच हवी : उद्योगमंत्री सुभाष देसाई

नाणारची चर्चा ग्रामस्थांशीच हवी : उद्योगमंत्री सुभाष देसाई

Published On: Jul 02 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना सुरुवातीपासूनच आहे. या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय हा विचारपूर्वकच घेण्यात आला असून नाणार संदर्भात चर्चा करायची असेल तर स्थानिक ग्रामस्थांशी करा. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत कोकणातील जनतेवर नाणार रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प लादू देणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. 

नाणार प्रकल्पाच्या विरोधातील वातावरण कमी करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती, पण त्यांनी नाकारली. यापार्श्‍वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाणार प्रकल्प रेटून नाही, तर चर्चेतून पुढे नेणार असे सांगत नाणारवरून दोन पक्षात निर्माण झालेली दरी कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी मात्र चर्चा करायची तर ग्रामस्थांशी करा, त्यांच्या भावना समजून घ्या, असे सांगत नाणार प्रश्‍नी शिवसेनेसोबत चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे.