Sun, Aug 18, 2019 15:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नायर’ला दात दाखवणे महागणार

‘नायर’ला दात दाखवणे महागणार

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:45AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील नामांकित नायर दंत महाविद्यालय व हॉस्पिटलमधील उपचारशुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दात काढणे व अन्य उपचारखर्च 10 रुपये ते 500 रुपयांनी वाढणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांसमोर सादर करण्यात आला आहे.

 नायर हॉस्पिटल व दंत महाविद्यालय हे मुंबई महापालिकेचे एकमेव दंत हॉस्पिटल आहे. गेल्या 82 वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये माफक दरात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गरीब रूग्णांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विभाग प्रमुख उपचाराच्या खर्चात 25 टक्के ते 100 टक्केपर्यंत सवलत देतात. पालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत तर, ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत देण्यात येते. या हॉस्पिटलच्या उपचाराच्या शुल्कात 2013 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर वाढलेले बाजारभाव, अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या वाढलेल्या किमती विचारात घेऊन, येथील उपचारशुल्कात 10 टक्के वाढ करण्यात येणार असून त्यामुळे हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा अजून सक्षम होईल, असा विश्वासही या विभागाकडून व्यक्त करण्यात आला.